मुंबई

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये एफएलएनसाठी जादा तासांचे आयोजन

CD

आश्रमशाळांमध्ये पायाभूत साक्षरता बळकट करण्यासाठी विशेष उपक्रम

कासा, ता. २२ (बातमीदार) : पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (एफएलएन) हे वाचन, लेखन व अंकगणिताशी निगडित मूलभूत कौशल्ये शालेय शिक्षणाचा कणा मानला जातो. केंद्र शासनाच्या निपुण भारत उपक्रमांतर्गत २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याने ही कौशल्ये आत्मसात करावीत, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने प्रथम संस्थासोबत सामंजस्य करार करून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून ज्यांना अतिरिक्त शैक्षणिक आधाराची गरज आहे, त्यांना मदत दिली जात आहे. ही पद्धत ‘विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीनुसार अध्यापन’ म्हणून ओळखली जाते. डहाणू येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ५४ आश्रमशाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचे २७ जानेवारी २०२६ रोजी मूल्यमापन करण्यात आले. या चाचणीत विद्यार्थ्यांचा सरासरी गुणांक २० पैकी १५.१७ इतका नोंदविण्यात आला, तर अनेक शाळांनी २० पैकी २० गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. बहुतांश विद्यार्थी एफएलएनची उद्दिष्टे पूर्ण करत असल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे.
तथापि, अपेक्षित स्तर गाठायचा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखन, वाचन व संख्याज्ञान अधिक बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांना वैयक्तिक लक्ष देणे तसेच शालेय वेळेव्यतिरिक्त ‘जादा तास’ घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रथम संस्थाकडून विशेष तयार केलेले शैक्षणिक किट्स शाळांना वितरित करण्यात आले असून, अक्षर, शब्द व संख्यांचे ज्ञान खेळ व कृतीआधारित पद्धतीने दिले जाणार आहे.
याशिवाय, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी उन्हाळी सुट्टीत ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा हेतू दंडात्मक कारवाई नसून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक पातळीची अचूक माहिती मिळावी आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचवता यावे, हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT