मुंबई

बालविवाहाविरोधी जनजागृतीला चालना

CD

बालविवाहाविरोधी जनजागृतीला चालना
कासा पोलिस ठाण्यात किशोरी मुलींची शैक्षणिक भेट

कासा, ता. २२ (बातमीदार) : आरोहन संस्थेच्या पुढाकाराने डहाणू तालुक्यातील दुर्गम भागातील धरमपूर, कोशेसरी, भवाडी आणि खाणीव शालेय किशोरी मुलींसाठी कासा पोलिस ठाणे येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीदरम्यान मुलींनी पोलिस विभागाची कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहून समजून घेतली.
या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक राजीव चौधरी यांनी बालविवाह या गंभीर सामाजिक प्रश्नावर सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर तरतुदी तसेच बालविवाह टाळण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. समाजात जनजागृती निर्माण होणे अत्यावश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला. यासोबतच शस्त्रांविषयी प्राथमिक माहिती देत शस्त्रांचा वापर कोणत्या परिस्थितीत व कशा प्रकारे केला जातो, याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पोलिस ठाण्यात तक्रार कशी नोंदवावी, विविध कक्षांचे कामकाज कसे चालते तसेच नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहितीही मुलींना देण्यात आली. यानंतर पोलिस निरीक्षकांच्या कक्षात संवादात्मक चर्चा घेण्यात आली. ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलिसांचे ब्रीदवाक्य समजावून सांगत नागरिकांचे संरक्षण व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे ही पोलिसांची प्रमुख जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
या शैक्षणिक भेटीदरम्यान गोपनीय विभागाचे सागर हागारे तसेच आरोहन संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमामुळे किशोरी मुलींमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढीस लागली असून, शासकीय यंत्रणांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. एकंदरीत या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचे गैरसमजदेखील विद्यार्थिनींकडून दूर झाले. पोलिस हे अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी असतात, असा विश्‍वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT