मुंबई

कासा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीत जनसंवादावर भर

CD

कासा पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीत ‘जनसंवादा’वर भर
पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घेतला आढावा
कासा, ता. २२ (बातमीदार) : कासा पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीनिमित्त पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी रविवारी (ता. २२) पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. केवळ औपचारिकता न पाळता, पोलिस अधीक्षकांनी स्थानिक नागरिक, पोलिस पाटील आणि पत्रकारांशी थेट संवाद साधून ‘‘पोलिस ठाण्यात आणखी कोणत्या सुधारणा करता येतील?’’ याकडे आपले विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट केले.

तपासणीच्या सुरुवातीला पोलिस अधीक्षकांनी जवानांची परेड घेतली. या वेळी जवानांचा पेहराव, शारीरिक सक्षमता (फिटनेस) आणि शस्त्रास्त्रांची पाहणी करण्यात आली. शिस्तबद्ध परेडनंतर पोलिस ठाण्याच्या वतीने अधीक्षकांना औपचारिक सलामी देण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचारी, पोलिस पाटील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष बैठकीत ग्रामीण भागातील गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने बालविवाह, कुमारी माता, कुपोषण आणि अर्धवट शिक्षण, ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वाहने आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे यावर चर्चा झाली. याप्रसंगी कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील, हेमंत धानमेर, ईश्वर काकड, श्रावण गावित यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पोलिस पाटील उपस्थित होते.

पोलिस पाटील पदे
कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६४ गावांपैकी केवळ नऊ ठिकाणी पोलिस पाटील पदे भरलेली असून, उर्वरित पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आणली गेली. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

अपघातांना कारणीभूत यंत्रणांवर होणार कारवाई
महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करत पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, ‘‘अपघातांना कारणीभूत ठरणारे रस्ते दोष किंवा इतर घटकांबाबत जबाबदार असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरही आता कारवाई करण्यात येईल.’’ शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत प्रबोधन करून, त्यानंतर विनापरवाना चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ध्वनिप्रदूषणाबाबत इशारा
सध्या परीक्षांचा कालावधी असल्याने रात्री १० नंतर मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, धर्माच्या नावाखाली अवैध अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. उत्सवासाठी कोणाकडूनही जबरदस्तीने वर्गणी वसूल करू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

थेट संवादासाठी व्हॉट्सॲप क्रमांक
गावपातळीवरील वाद आणि गुन्हेगारीची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी आपला स्वतःचा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांना दिला. ‘‘शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक होत असल्याचे फोटो पाठवल्यास त्यावर त्वरित कारवाई केली जाईल,’’ असे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT