मुंबई

तीर्थक्षेत्र वज्रेश्वरीत ४१ दिवसांचा फिरता सप्ताह

CD

वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील आसरा नगरमध्ये श्रीराम उत्सव समितीच्या वतीने ४१ दिवसांचा फिरता सप्ताह छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला. ‘एक गाव, एक सोहळा, एक उत्सव’ या संकल्पनेनुसार कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वज्रेश्वरी देवी, प्रभू श्रीराम आणि नित्यानंद भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी वारली रत्न कीर्तनकार हभप. हरिश्चंद्र महाराज कुवरा उपस्थित होते. मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, भजन तसेच विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. महिलांना हळदीकुंकवाचा वाण देण्यात आला, तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हभप हरिश्चंद्र महाराज कुवरा यांनी आपल्या कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत धर्मजागृतीचा संदेश दिला. यावेळी धर्म जागरण ठाणे जिल्हा संत संपर्क प्रमुख पराग पाटील उपस्थित होते. सप्ताहाचे संपूर्ण आयोजन वनमाळी संस्था अध्यक्षा वैशाली पाटील-ठक्कर यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

‘माधुरीसोबत रोमाँन्स करताना मला...' इंटिमेंट सीनबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले...'तिच्या डोळ्यात पाहिलं की...

Jalgaon Municipal Corporation जळगावकरांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे! ३०० फुटांच्या घरांची घरपट्टी यंदा तरी माफ होणार का?

SCROLL FOR NEXT