मुंबई

“ठाणेकरांचे प्रेम म्हणजे हरवलेल्या मित्राची भेट” - जितेंद्र कपूर

CD

चित्रपटाचे वेड आजही कायम, प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत
अभिनेते जितेंद्र कपूर यांना ‘धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
ठाणे, ता. २२ (बातमीदार) : मी अभिनेता असल्याचे कदाचित विसरलो असेन; पण प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत, असे भावनिक उद्‍गार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी काढले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही चित्रपटाविषयीचे प्रेक्षकांचे वेड कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी (ता. २२) जितेंद्र कपूर यांना ‘धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. कार्यक्रमास सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान जितेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
पूर्वी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की रस्ते ओस पडायचे. आता चित्रपट मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले जातात; मात्र चित्रपटाचे आकर्षण अजूनही कायम आहे, असे ते म्हणाले. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांनी ‘सेहरा’ आणि ‘गीत गाया पत्थरोने’ या चित्रपटांचा उल्लेख केला. एक पंजाबी मुलगा मराठी बोलतो याचे शांतारामांना विशेष कौतुक होते, असे त्यांनी सांगितले. तसेच श्रीदेवी आणि रेखा यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव त्यांनी शेअर केले. यशामुळे आत्मविश्वास वाढतो; मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, कामाप्रति निष्ठा आणि गांभीर्य हेच कलाकाराचे खरे गुण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बालपणाच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना गिरगावातील वास्तव्याचा उल्लेख केला. माझ्या आयुष्याची १८ वर्षे मी गिरगावात घालवली. आजूबाजूला मराठी आणि कोकणी कुटुंबे होती. त्यामुळे दोन्ही भाषा आत्मसात केल्या. चारमजली इमारतीतील ८० खोल्या म्हणजे एकच मोठे कुटुंब होते. छोट्या गोष्टींत आनंद मानायचो. आज सर्व काही असूनही तो मानसिक आनंद मिळत नाही, असेही ते मराठीत म्हणाले.

ठाणेकरांचे प्रेम म्हणजे हरवलेल्या मित्राची भेट!
ठाणेकरांविषयी बोलताना त्यांनी मी ठाण्यात अनेक वेळा आलो आहे. इथल्या प्रेक्षकांविषयी मनापासून आदर आहे. प्रत्येकाने मला भरभरून प्रेम दिले असून, प्रत्येक जण हरवलेला जुना मित्र भेटल्यासारखा वाटला, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT