मुंबई

पुणे लिंक रोडवर जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला; हजारो लिटर पाण्याची नासाडी

CD

जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटला
पुणे लिंक रोडवर हजारो लिटर पाण्याची नासाडी

​कल्याण, ता. २२ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरू असतानाच रविवारी (ता. २२) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. प्रभाग ‘ड’ कार्यालयासमोर असलेल्या काटेमानिवली टाकीजवळील जलवाहिनीचा मुख्य व्हॉल्व्ह फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे संपूर्ण पुणे लिंक रोडला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
​सकाळच्या सुमारास व्हॉल्व्ह फुटल्याने पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडू लागले. पाण्याचा दाब इतका मोठा होता, की काही वेळातच संबंधित रस्ता जलमय झाला. सुट्टीचा दिवस असल्याने परिसरातील शाळा बंद होत्या. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती; तरीही साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या गळतीमुळे मौल्यवान पाण्याची मोठी नासाडी झाली असून, याचा थेट फटका कल्याण पूर्वेतील प्रभाग ‘ड’ आणि ‘जे’ अंतर्गत येणाऱ्या परिसरांना बसला आहे.
​घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पाणीगळती रोखण्यासाठी मुख्य पुरवठा बंद करण्यात आला असून, दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. व्हॉल्व्ह फुटल्यामुळे झालेली गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सध्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या काही तासांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर परिसराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर म्हणाले.

​पुणे लिंक रोडवर एका बाजूला आधीच जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. आता दुसऱ्या बाजूला व्हॉल्व्ह फुटल्याने प्रशासकीय नियोजनावर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT