मुंबई

आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ

CD

पनवेल, ता. २२ (बातमीदार) : शासकीय योजना राबवायची आहे पण गरजूंना लाभ द्यायचा नाही, अशाच प्रकारचे धोरण शिक्षण विभागाने अवलंबल्याचे दिसून येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशासाठी तीन व पाच किमी अंतराची अट कमी केली आहे. आता केवळ एक किमी अंतराच्या आतील विद्यार्थीच आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. परिणामी आरटीई प्रवेश मृगजळ ठरणार आहे, अशी टीका पालकवर्गातून होत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा व विनाअनुदानित शाळांत मोफत प्रवेश दिला जातो. या शाळांना एकूण पटसंख्येच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब, क, ड), इतर मागासवर्ग (ओबीसी), विशेष मागासवर्ग (एसबीसी), आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्हीबाधित, अनाथ, दिव्यांग, कोरोना प्रभावित बालकांचा वंचित घटकात समावेश होतो.

पालकांचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणारी बालकेही दुर्बल घटकातून प्रवेशासाठी पात्र ठरतात. प्रवेशासाठी शाळेपासून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंतच्या अंतराची अट आहे. यापूर्वी हवाई अंतरासाठी एक किमी, तीन किमी व पाच किमी असे तीन टप्पे होते. प्राधान्याने कमी अंतरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते. यंदा मात्र यात मोठा बदल करण्यात आला आहे. तीन व पाच किमीचे टप्पे काढून टाकण्यात आले आहेत. याचाच अर्थ शाळेपासून एक किमी अंतरावर घर असणारे विद्यार्थीच पात्र ठरणार आहेत.

मुळात अंतराचा बदललेला नियमच गैरलागू आहे. शाळेपासून एक किमी अंतरात असे किती विद्यार्थी असणार आहेत, हादेखील प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आरटीई प्रवेशापासून वंचित राहणार आहेतच; पण शहरातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणे कठीण होणार आहे. मोठ्या शहरात तर परिस्थिती आणखी बिकट असणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश विद्यार्थ्यांसाठी मृगजळ ठरणार, असा संताप पालक करीत आहेत.

११३ शाळांची नोंदणी पूर्ण
खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पनवेल शिक्षण विभागाकडून ११३ शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, या प्रवेश प्रक्रियेनुसार दोन हजार ६३१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी दिली.

आर्थिक भार कमी करण्याचा उद्देश?
स्वयंअर्थसहाय्यित शाळा व विनाअनुदानित शाळांत आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात नाही. ही रक्कम संबंधित शाळांना सरकारकडून दिली जाते. त्याचा भार कमी करण्यासाठीच शिक्षण विभागाने अंतराची अट बदलली असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT