मुंबई

मेट्रो-४ च्या बीमला तडे

CD

मेट्रो-४च्या बीमला तडे!
सुपर स्ट्रक्चर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मेट्रो-४ मार्गावर मुलुंड येथे मेट्रोचा स्लॅब कोसळून अपघात झालेला असतानाच आता घाटकोपर परिसरात मेट्रोच्या बीमला (सुपर स्ट्रक्चर) तडे गेल्याची बाब समोर आली आहे. त्याबाबत मुंबई महापालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाकडून पत्र देण्यात आल्याची चर्चा आहे. तर बीम पूर्णपणे सुरक्षित, मजबूत आणि स्थिर असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

घाटकोपर येथे एलबीएस रोडवरील मेट्रो लाइन-४च्या सुपर स्ट्रक्चर बीममध्ये तडे गेले असल्याची तक्रार शनिवारी नागरिकांकडून पालिकेला मिळाली होती. त्याची दखल घेत पालिकेच्या ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी मेट्रोच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एन विभागातील मेट्रो लाइन-४च्या सर्व संरचनात्मक घटकांची तपासणी करून त्यांची स्थिरता आणि आयएस मानकांनुसार पडताळणी करावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

तडा नव्हे अतिरिक्त काँक्रीट स्लरी
मेट्रो लाइन-४ वरील प्रस्तावित श्रेयस सिनेमा मेट्रो स्थानकाजवळ (दोन गर्डर्सच्या दरम्यान) असलेल्या भागाची एमएमआरडीएच्या प्रकल्प पथकाने तपासणी केली आहे. या ठिकाणी तडे गेल्यासारखी दिसणारी रेषा ही अतिरिक्त काँक्रीट स्लरी (बांधकामादरम्यान वापरले जाणारे सिमेंट, पाणी आणि अ‍ॅडिटिव्ह्जचे मिश्रण) आहे. अशी अतिरिक्त स्लरी कधी कधी पृष्ठभागावर दिसू शकते. तपासणीदरम्यान पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत किंवा बीमला तडे गेले आहेत, असे कोठेही आढळले नाही. दरम्यान, ही अतिरिक्त स्लरी काल रात्री काढून टाकण्यात आली आहे. तसेच या ठिकाणावरील बीम पूर्णपणे सुरक्षित, मजबूत आणि स्थिर असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीप ऑन फायर! पॉवर-प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला दिले ३ धक्के; पाहा Video

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT