मुरबाड, ता. २२ (बातमीदार) : विजेच्या खांबावर देखभाल व दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुरबाड तालुक्यातील माळ गावाजवळ शनिवारी संध्याकाळी घडली. चीमा जानू पारधी (रा. सुकाळवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरोशी सेक्शनअंतर्गत माळ येथे डीपी स्ट्रक्चरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी दोन कामगार गेले होते. नियमानुसार ट्रान्स्फॉर्मरवरील काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतरच पारधी हे खांबावर चढले होते. महावितरणचे मुरबाड येथील उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कामगार खाली थांबून होता, तर पारधी दुरुस्तीसाठी खांबावर चढले होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना नियमानुसार आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चौकशीची मागणी
बंद केलेला वीजपुरवठा अचानक कसा सुरू झाला, याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याचे देवके यांनी सांगितले. घटनेनंतर परिसरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ग्रामस्थ व विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.