मुंबई

मालाडमध्ये डीप क्लिनिंग मोहीम उत्साहात

CD

मालाडमध्ये डीप क्लिनिंग मोहीम उत्साहात

मालाड (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मिलाप सिनेमा संकुल आणि आसपासच्या परिसरात व्यापक ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. अलीकडेच, मालाड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे बराच काळ ताबा मिळवलेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची दुकाने आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. या अतिक्रमणांमुळे परिसरात घाण, दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि उंदरांची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक रहिवाशांनाही ये-जा करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यासाठी पालिकेच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान पी/उत्तर वॉर्ड चे अधिकारीही उपस्थित होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त कृतीने मालाड स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: रस्ते आणि पुलांना नवी ओळख मिळणार! मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलणार; पण कोणत्या? जाणून घ्या यादी...

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT