मुंबई

विरार, नालासोपाऱ्यात रेल्वे उड्डाणपुल

CD

वसई-विरारचा कायापालट
हायवेपासून स्थानकांपर्यंत सिमेंट रस्ते; रेल्वे उड्डाणपुलांनाही ‘ग्रीन सिग्नल’

विरार, ता. २३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गापासून विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांपर्यंत जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, तसेच विराटनगर व ओसवालनगरी येथील रेल्वे उड्डाणपुलांची कामे आता ''सर्वोच्च प्राधान्याने'' पूर्ण केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ''वॉर रूम''च्या निर्देशानुसार आणि भाजप आमदार राजन नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ''एमएमआरडीए''ने (MMRDA) आयोजित केलेल्या आढावा बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विकासकामांना गती देण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल यांच्याकडे या परिसराची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार राजन नाईक यांच्यासह एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे नगर अभियंता प्रदीप पाचंगे उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
काँक्रीट रस्ते : महामार्गापासून विरार व नालासोपारा स्टेशनपर्यंत येणारे रस्ते तातडीने सिमेंटचे करण्यात येतील. त्यासाठी महापालिकेला खर्चाचा निश्चित आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया सुरू होईल.

रेल्वे उड्डाणपूल : विराटनगर आणि ओसवालनगरी येथील प्रलंबित उड्डाणपुलांच्या कामांना गती दिली जाणार आहे.

रिंगरूट प्रकल्प : वसई तालुक्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ''रिंगरूट''चा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या जंक्शनवर होणार उड्डाणपूल
शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सहा प्रमुख ट्रॅफिक जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी महापालिकेने सुधारित खर्चाचा अंदाज सादर करावा, असे निर्देश रुबल अगरवाल यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे भविष्यात वसई-विरारमधील प्रवासाचा वेळ वाचणार असून, शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी दिली.

या ठिकाणी होणार उड्डाणपूल :
१. गोखिवरे जंक्शन
२. चंदननाका जंक्शन
३. मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन
४. माणिकपूर ते बाभोळा नाका
५. वसंत नगरी ते एव्हरशाईन
६. नारिंगी (साईनाथनगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT