मुंबई

महेश मोरे यांना सामाजिक कार्यासाठी पीएच.डी. पदवी

CD

महेश मोरे यांना सामाजिक कार्यासाठी पीएच.डी. पदवी
नवी दिल्लीतील दीक्षांत समारंभात गोल्ड मेडल प्रदान; आदिवासी विकासातील कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
माणगाव, ता. २३ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणारे माणगाव येथील महेश गोपाळ मोरे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सीडरब्रुक युनिव्हर्सिटी (यूएसए)तर्फे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D) पदवी व गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या दीक्षांत समारंभात हा सन्मान देण्यात आला.
कृषी पदवीधर असलेले मोरे यांनी वनहक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा, रोजगार हमी, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा आदी विषयांवर आदिवासी समाजात प्रभावी जनजागृती करून अनेकांना हक्क मिळवून दिले. ग्रामीण उद्योजकता या विषयावर अभ्यास करत त्यांनी महिला बचत गट, युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राज्य शासनाच्या सीएमईजीपी योजनेची माहिती तळागाळात पोहोचवून अनेक लघुउद्योग उभे राहण्यास मदत केली. त्यांच्या कार्यासाठी यापूर्वी रायगड भूषण, आदिवासी मित्र तसेच जनजाती गौरव सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
या यशामागे कुटुंबीय, मित्रपरिवार व मार्गदर्शकांचे मोठे योगदान असल्याची भावना मोरे यांनी व्यक्त केली. या सन्मानाबद्दल त्यांनी विद्यापीठाचे आभार मानले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

(छायाचित्र : महेश मोरे यांना पीएच.डी. पदवी व गोल्ड मेडल प्रदान करताना.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT