मुंबई

भ्रष्टाचार तक्रारीच्या रागातून मारहाण

CD

कंत्राटदाराकडून ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण
भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा राग; मारहाणीत वृद्धाचा हात फ्रॅक्चर; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे, ता. २३ : शासकीय कामांमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे एका ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून एका कंत्राटदाराने ६३ वर्षीय वृद्धाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचा हात फ्रॅक्चर झाला असून, वर्तकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश शंकरराव देशमुख (६३, रा. कल्याण) असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास देशमुख हे वर्तकनगर येथील पार्किंग प्लाझा इमारतीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात काही कामानिमित्त आले होते. तिथे त्यांची भेट त्यांचे नातेवाईक असलेले कंत्राटदार अतुल अर्जुन चौधरी (३०) यांच्याशी झाली. देशमुख यांनी यापूर्वी चौधरी यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शासनाकडे लेखी तक्रार केली होती. याच कारणावरून संतापलेल्या चौधरीने कार्यालयातच देशमुख यांना गाठून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि चौधरीने देशमुख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हल्ल्यानंतर देशमुख यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्यांना तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या ‘एक्स-रे’ अहवालात त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीखालील हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही अपरिहार्य कामांमुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचे देशमुख यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिस कारवाई
याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आरोपी अतुल चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शासकीय कार्यालयातच एका ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT