मुंबई

फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा तीव्र

CD

जव्हारमध्ये फेब्रुवारीतच मे महिन्याचा चटका
थंडपेयांच्या दुकानांत गर्दी; ‘मिनी महाबळेश्वर’मध्ये उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार शहरात यंदा उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारीतच तीव्रतेने लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी कमाल तापमानाने २६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

सकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण असले, तरी दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता असह्य होत आहे. शिमगा (होळी) सण तोंडावर आल्याने नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत, मात्र उन्हामुळे सर्वांचीच तारांबळ उडत आहे. दुचाकीस्वार आणि पादचारी उन्हापासून वाचण्यासाठी रुमाल, टोपी आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे बांधकाम मजूर, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांच्या कामाचा वेग मंदावला असून, त्यांच्या रोजंदारीवरही परिणाम होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे जव्हारमधील थंडपेयांच्या दुकानांना सुगीचे दिवस आले आहेत. उसाचा रस, लिंबूपाणी, ताक आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शीतपेयांच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला
वाढत्या तापमानाचा विचार करता आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करावे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे :
हवामान अंदाज : पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता.
परिणाम : मार्चपूर्वीच तीव्र उन्हामुळे यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहण्याचे संकेत.
वर्दळ : दुपारी १२ ते ४ दरम्यान मुख्य बाजारपेठ आणि एसटी स्टँड परिसरात वर्दळ घटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : सटाणा शहराचा होणार कायापालट; २६ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी पथक सज्ज

T20 World Cup: संजू सॅमसनला संधी मिळणार? पण, त्यासाठी अभिषेकसह तीन खेळाडू रडारवर; कोणाची विकेट पडणार?

का मोडलेला रिमा लागू यांचा संसार? एकटेपणा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घेतलेला घटस्फोट

Powai News: आयआयटीच्या विद्यार्थ्याकडे जिवंत काडतुसे, धागेदोरे बिहारपर्यंत; पवईतील प्रकाराने खळबळ

Latest Marathi News Live Update : वर्धामध्ये प्रस्तावीत कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज माहितीचे संकलन

SCROLL FOR NEXT