मुंबई

फेरीवाल्यांना सत्ताधाऱ्यांचा दिलासा

CD

मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांना दिलासा
सत्ताधाऱ्यांकडून बाजार शुल्कात कपात!
भाईंदर, ता. २३ (बातमीदार): मिरा-भाईंदर शहरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हजारो फेरीवाल्यांना सत्ताधारी भाजपने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. प्रशासकीय राजवटीत बाजार शुल्कात (Market Fee) करण्यात आलेली ५० टक्क्यांची वाढ अन्यायकारक असल्याचे सांगत, नवीन सत्ताधाऱ्यांनी या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा-भाईंदर महापालिका कंत्राटदाराच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांकडून दररोज शुल्क वसूल करते. नवीन निर्णयानुसार, आता २ चौरस मीटर पर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या फेरीवाल्यांना पूर्वीच्या ८९ रुपयांऐवजी ७४ रुपये प्रतिदिन शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, ज्या फेरीवाल्यांचे क्षेत्रफळ २ चौरस मीटरपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठीचे शुल्क ११८ रुपयांवरून कमी करून आता १०५ रुपये करण्यात आले आहे.

निर्णयाबाबत माहिती देताना महापौर डिंपल मेहता यांनी सांगितले की, प्रशासकीय काळात बाजार शुल्कात झालेली वाढ सर्वसामान्य फेरीवाल्यांवर अन्याय करणारी होती. त्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन ही कपात करण्यात आली आहे. शहरातील सुमारे ८,५०० अधिकृत फेरीवाल्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असून, यामुळे त्यांचे दैनंदिन आर्थिक ओझे काही प्रमाणात कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT