मुंबई

विद्याभवनच्या दोन्ही शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी

CD

विद्याभवनच्या दोन्ही शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी
राज्यस्तरीय बाह्य मूल्यांकनात मानांकन; नवी मुंबईतील तीनपैकी दोन शाळा विद्याभवनच्या
नेरुळ, ता. २३ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकनात विद्याभवन प्राथमिक मराठी व विद्याभवन प्राथमिक इंग्लिश या दोन्ही शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईत ‘ए प्लस’ मानांकन मिळालेल्या तीन शाळांपैकी दोन शाळा विद्याभवन शिक्षण संकुलातील असल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विद्याभवन शिक्षण संकुलाने गेल्या वर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत ११ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात मिळालेले हे मानांकन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, शिस्त, उत्कृष्ट शैक्षणिक निकाल तसेच कला, क्रीडा व स्पर्धा परीक्षांमधील यश या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून हे मानांकन मिळाल्याचे समन्वयक पांडुरंग मुळीक यांनी सांगितले.
या यशाबद्दल स्थानिक नगरसेवक सचिन लवटे, गिरीश म्हात्रे, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, कुलसचिव दिनेश मिसाळ, पालक व शिक्षकांनी मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ व मनिषा मुळीक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT