मुंबई

सायन स्थानकाबाहेरील भुयारी मार्ग सुरू

CD

सायन स्थानकाबाहेरील भुयारी मार्ग सुरू

धारावी, ता. २३ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन स्थानकाबाहेर धारावीतून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी एक भुयारी मार्ग बनवण्यात आला होता. मात्र, वाहतूक पूल नूतनीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी हा भुयारी मार्ग तोडण्यात आला होता. यामुळे धारावीकरांना रस्त्यावरून वाट काढत स्थानक गाठावे लागत होते. दरम्यान, आता पर्याय म्हणून स्थानकासमोरील लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रस्त्याखालून नव्याने एक धारावीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग सुरू करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या भुयारी मार्गाचे काही काम सुरू आहे. तरीही त्याचा उद्घाटनाचा सपाटा लावण्यात आला असल्याचे मत येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) या दोघांनी वेगवेगळ्या दिवशी या भुयारी मार्गाचे उद्घाटन केल्याने या राजकारण्याच नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न धारावीकरांना पडला आहे. त्यातच पूर्वीच्या भुयारी मार्गाला पायऱ्या नव्हत्या. मात्र, नव्या भुयारी मार्गाला पायऱ्या असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले, रुग्ण व्यक्ती व दिव्यांगाना त्रास होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी धारावीकरांनी उचलून धरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT