मुंबई

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश

CD

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश
नाका कामगारांची सेवा कायम

नेरूळ, ता. २३ (बातमीदार) : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत नाका कामगारांची सेवा महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कायम झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी शिवजयंती उत्साहात साजरी करत कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
ॲन्थोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड कंपनीमार्फत गेल्या सहा महिन्यांपासून हे कामगार घनकचरा विभागात कार्यरत होते. त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळावे, यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनने महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी निदर्शनेही करण्यात आली होती. अखेर शिवजयंतीच्या मुहूर्तावर सेवा कायम करण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी जल्लोष साजरा केला.
कोपरखैरणे पार्किंग परिसरात झालेल्या कार्यक्रमात युनिट अध्यक्ष रवी राठोड, कंपनीचे व्यवस्थापक भोसले तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे कामगारांच्या भवितव्याला स्थैर्य मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT