मुंबई

शहादत दिनानिमित्त मुरुडमध्ये विविध उपक्रम

CD

शहादत दिनानिमित्त मुरूडमध्ये विविध उपक्रम
मुरुड, ता. २३ (बातमीदार) : शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहादत दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, नांदगाव येथे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सहिष्णुता आणि बलिदानाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. शासनाच्या शिक्षण विभागांच्या आवाहनानुसार शाळेत चित्रकला, प्रश्नमंजुषा आणि वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुरू तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक चित्रे साकारली तसेच प्रश्नमंजुषेद्वारे आपले ज्ञान प्रदर्शित केले. या वेळी त्यांनी धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाविषयी माहितीपट दाखविण्यात आला. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका अर्चना खोत, पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन त्यांच्या विचारांचे महत्त्व समजले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT