मुंबई

भिक्षेकरी महिलेने स्वतःला घेतले जाळून

CD

भिक्षेकरी महिलेची आत्महत्या
मानसिक संतुलन बिघडल्याने टोकाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (ता. २२) जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासानंतर सोमवारी (ता. २३) या घटनेला वेगळी कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, कल्याण परिसरात भिक्षा मागून पोट भरणाऱ्या या महिलेचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यातूनच तिने स्वतःला जाळून घेतल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्थानकात या प्रकरणासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील नाल्यात एका ४५ ते ५० वयोगटातील महिलेला स्वतःला जाळून घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, इमारत व पत्र्याचे कंपाउंडद्वारे तयार झालेल्या कोपऱ्यात एका अनोळखी महिलेच्या कपड्यांना आग लागून ती खाली पडलेली दिसली. तसेच तिच्या बाजूस असलेला कचराही जळत असताना आढळून आला. घटनास्थळी तत्काळ पोहोचून सपोनि हनुमंत हुंबे आणि सपोनि विनोद पाटील यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तेथील आग विझवली. या महिलेला रुग्णवाहिकेतून केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

यासंदर्भात सदर प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सदर महिलेने आत्महत्या केल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येत असल्याचे सांगितले. सकाळी अंघोळ केल्यानंतर तिने आगपेटीचा वापर करून स्वतःला जाळून घेतल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. घटनास्थळी असलेली प्लॅस्टिकची टाकी वितळून गेल्याचेही तपासात समोर आले आहे. तेथील एका आस्थापनेकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून घेतले असून, त्याद्वारे अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT