ठाण्यात पाच अल्पवयीन मुली बेपत्ता
ठाणे : ठाणे शहरातील कासारवडवली, वर्तकनगर, वागळे इस्टेट आणि दिवा परिसरातून पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन सख्ख्या चुलत बहिणींचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कासारवडवलीतील १२ व १५ वर्षीय बहिणी दुपारी घराबाहेर पडल्यानंतर परतल्या नाहीत. वागळे इस्टेटमध्ये चिकन आणण्यासाठी गेलेली १३ वर्षीय मुलगी, वर्तकनगरमधील १६ वर्षीय मुलगी आणि दिव्यातील १६ वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजला जाते सांगून बेपत्ता झाली आहे. या सर्व प्रकरणांत फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलीस तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.