मुंबई

जगाच्या नकाशावर ठसा

CD

जगाच्या नकाशावर ठसा
पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांची उभारणी
पालघर, ता. २४ ः हरित वाढवण बंदर, चौथी मुंबई, सिडको नवनगर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे, वाढवण विमानतळ, मुंबई-दिल्ली समर्पित रेल्वे मालवाहू प्रकल्प (डब्ल्यूडीएफसी), राष्ट्रीय महामार्ग १६० अ, पश्चिम उपनगरांशी जोडणारा सेतू, एमएमआर क्षेत्राचे विस्तारीकरण तसेच विविध औद्योगिक प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे आगामी पाच वर्षांत जगाच्या नकाशावर पालघर जिल्ह्याचे स्थान अधोरेखित करणार आहे.
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर वसलेला पालघर जिल्हा आगामी पाच वर्षांत विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. सागरी-नागरी-डोंगरी अशा भौगोलिक क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी झाली आहे. सागरीकिनाऱ्यापासून डोंगरी आदिवासी भाग, नागरी औद्योगिक पट्ट्यापासून राष्ट्रीय दळणवळणाच्या महामार्गांपर्यंत अनेक महत्त्वाचे प्रकल्प एकाच वेळी आकार घेत आहेत. बंदर, बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, विमानतळ, रेल्वे मार्ग आणि औद्योगिक गुंतवणुकीमुळे पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट होणार आहे.
-----------------------
वाढवणमुळे सागरी क्रांती
डहाणू तालुक्यातील वाढवण येथे ७७ हजार कोटींचा प्रस्तावित प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. या प्रकल्पामुळे पालघर तसेच राज्यात हजारो कोटींची थेट आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक चालना मिळणार आहे. बंदरांमुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, लॉजिस्टिक पार्क, वेअर हाऊस, कंटेनर टर्मिनल्सची उभारणी होणार आहे. मत्स्यव्यवसायासाठी आधुनिक सुविधा तयार होतील. डहाणू-तलासरी परिसरात सेवा उद्योगांची वाढ होऊन झपाट्याने विकास होणार आहे.
------------------------
बुलेट ट्रेनमुळे वेगवान विकास
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पालघर, बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी आणि औद्योगिक विकासाची अपेक्षा आहे. कमी वेळेत संपर्क झाल्याने सुलभता वाढून या भागात विविध क्षेत्रांत आर्थिक गुंतवणूक आणि परिसर विकास होणार आहे. आयटी, स्टार्टअप, सेवा उद्योगांना चालना मिळणार असून, जमीन व्यवहार्यता वाढून नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी, शिक्षण व आरोग्य सुविधा विस्तारणार आहेत.
-------------------------
मुंबई-बडोदा मार्गामुळे गती
जिल्ह्यातील मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेमुळे पालघर देशातील प्रमुख औद्योगिक शहरांशी थेट जोडला गेला आहे. नव्या कॉरिडॉरमुळे ग्रामीण जिल्ह्याला विकासाची नवीन दिशा मिळणार आहे. शेतीमाल थेट बाजारपेठेत पोचवण्यास मदत होईल. कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल. जिल्ह्यात पर्यटनाला चांगला वाव असल्याने पर्यटनस्थळांकडे सुलभ प्रवास शक्य आहे. तसेच मालवाहतूक खर्चात घट होणार आहे.
------------------------------
वाढवण विमानतळ
प्रस्तावित विमानतळामुळे पालघर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळणार आहे. विमानतळामुळे देशासह आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत होणार असून, आयात-निर्यात व्यवसायाला वेग मिळेल. पर्यटन आणि हॉटेल उद्योग विस्तारण्याची अपेक्षा आहे. या विमानतळामुळे मुंबईवरील प्रवासीसंख्येचा भार कमी होईल. तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण असेल.
----------------------------------
रिलायन्स यार्न प्रकल्प
टोकराळे येथे प्रस्तावित यार्न/टेक्स्टाईल प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन राज्यासह देशाच्या आर्थिक वाढीला फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर युवक व महिलांना रोजगार प्राप्त होऊन त्यांचे सक्षमीकरण होणार आहे. मध्यम आणि लघु उद्योगाची निर्मिती होणार असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे.
--------------------------
राज्य व केंद्र शासनाच्या समन्वयातून पुढील पाच वर्षांत पालघर जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळणार आहे. सागरीकिनारपट्टी, औद्योगिक पट्टा, आदिवासी डोंगरी भाग, झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वस्त्यांचा समतोल साधत प्रशासनाने सर्वंकष विकास आराखडा आखला आहे. दळणवळण, उद्योग, पर्यटन, आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत मोठ्या गुंतवणुकीची पायाभरणी आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT