विरार, ता. २५ (बातमीदार)ः वसई-विरार महापालिका क्षेत्रातील अनेक शाळांच्या इमारती धोकादायक, नादुरुस्त अवस्थेत आहेत. पावसाळा जवळ येत असल्याने, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी इमारतींची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघाच्या वसई तालुका पदाधिकाऱ्यांनी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस यांच्याकडे केली आहे.
पेल्हार हायवे शाळा, जानकीपाडा शाळांच्या इमारती पाडल्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या धोकादायक शाळांचे संरचनात्मक परिक्षण करून पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करणे, पालिका क्षेत्रातील शाळांची वीजदेयके पालिकेने स्वतः भरावीत, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालोपयोगी साहित्य (वह्या, पुस्तके, गणवेश) शाळा सुरू होताच उपलब्ध करून द्यावे तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रम राबवून सन्मानित करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या भेटीवेळी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष कॅथरीन परेरा, जिल्हा कोषाध्यक्ष आसमा शेख, तालुकाध्यक्ष सोनाली भगत, सचिव जोलिना फरगोज, कार्याध्यक्ष ज्युली फर्नांडिस, सदस्य आबेदा शेख, वीना फरेल, रेखा डाबरे उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.