मुंबई

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड फायदेशीर

CD

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड फायदेशीर
आमदार विनोद निकोले यांचे शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

वाणगाव, ता. २६ (बातमीदार) : जंगल संपत्ती झपाट्याने कमी होत असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसोबत वृक्षलागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासोबत पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो, असे प्रतिपादन डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केले.
वन विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल यांच्या संयुक्त विद्यमाने कोसबाड येथे कृषी वानिकी अंतर्गत शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन आमदार निकोले, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री आणि ठाणे येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी रामेश्वरी बोंगाळे यांच्या हस्ते झाले. १८ फेब्रुवारीपासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत दर्जेदार रोपे निर्मिती, शेतकऱ्यांसाठी वनशेती प्रशिक्षण तसेच युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर, प्रशांत वरठा, देशमुख आणि दामिनी तांडेल यांनी शेतकऱ्यांना कृषी वानिकीचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी कृषी वानिकीमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विभागीय वनाधिकारी रामेश्वरी बोंगाळे यांनी वृक्षलागवड योजना, ग्राम वन विकास योजना, हरित अभियान, रोपवाटिका विकास योजना आणि वृक्ष कन्या योजना यांची सविस्तर माहिती दिली. कृषी वानिकीमुळे जमिनीची धूप कमी होऊन हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण मिळण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकात्मिक शेतीत वृक्षलागवड फायदेशीर
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी एकात्मिक शेतीत वृक्षलागवडीमुळे चारा उपलब्धता, मृदसंधारण आणि पर्यावरणीय समतोल साधता येतो, असे सांगितले. डहाणू येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर अजय खेरावकर यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या सहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT