मुंबई

तरुणाच्या आत्महत्येनंतर संतापाची लाट

CD

तरुणाच्या आत्महत्येनंतर संतापाची लाट
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील तीसगाव नाका परिसरात भटक्या श्वानांच्या दहशतीने एका ३० वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. श्वानदंशामुळे झालेल्या रेबीजच्या त्रासाला कंटाळून आयेश विश्वनाथ अमीन या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात जनक्षोभ उसळला असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सहजीवन सोसायटीत राहणाऱ्या आयेश अमीनला काही दिवसांपूर्वी भटक्या श्वानाने चावा घेतला होता. दुर्दैवाने त्याला रेबीजची लागण झाली. या आजाराचा असह्य त्रास आपल्या वृद्ध आईवडिलांना पाहावा लागू नये, या विवंचनेतून आयेशने मृत्यूला कवटाळले. एका तरुण मुलाने अशा प्रकारे जीव गमावल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या लेखी निवेदनात प्रशासनावर थेट आरोप केले आहेत. भटक्या श्वानांची नसबंदी आणि लसीकरण केवळ कागदावरच राहिल्याने ही वेळ ओढवली आहे. प्रशासनाची निष्काळजी या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्यास आम्ही शांत बसणार नाही. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली.

प्रमुख मागण्या
तीसगाव परिसरात तातडीने श्वान पकड मोहीम राबवावी, सर्व भटक्या श्वानांचे लसीकरण आणि नसबंदी युद्धपातळीवर करावी, पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा असावा, कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या आरोग्य व पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT