मुंबई

बससेवा समस्यांवर नागरिकांचे गाऱ्हाणे

CD

जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : सानपाडा परिसरातील सार्वजनिक बससेवा संदर्भातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत स्थानिक रहिवासी सुनंदा निकम यांनी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांना लेखी निवेदन सादर केले. बसफेऱ्यांची अनियमितता, बसची कमतरता, बस स्थानकांची दुर्दशा आणि बंद करण्यात आलेल्या सेवांबाबत निवेदनात तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या निवेदनाची दखल घेत परिवहन प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

एनएमएमटीच्या १८ क्रमांकाच्या बसच्या फेऱ्यांमध्ये सध्या मोठा कालावधी असल्याने प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या बसच्या फेऱ्यांतील अंतर १५ मिनिटांपर्यंत कमी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सानपाडा रेल्वे स्थानक येथे एनएमएमटीची एकही बस थेट येत नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानकापर्यंत बससेवा सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

वाशी येथे जाण्यासाठी सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरून थेट बस उपलब्ध नसून केवळ कल्याण किंवा डोंबिवलीहून परतणाऱ्या बसच उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घणसोली ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या १० क्रमांकाच्या बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, जेणेकरून फुल व भाजी मार्केटमध्ये जाणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मुद्द्यांवर परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना सूचना देऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबईकडे जाणारी बससेवा बंद
पालिका परिवहनची मुंबईकडे जाणारी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, ती सेवा पुन्हा सुरू करावी. तसेच शहरातील अनेक बस स्थानक, थांब्यांवर बस क्रमांक दर्शविलेले नसल्याने प्रवाशांना अडचणी येतात. काही ठिकाणी बस थांब्यांचा वापर केवळ राजकीय पोस्टर लावण्यासाठी होत असल्याने शहराचे सौंदर्य विद्रूप होत आहे. या प्रकारावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT