खालापूर शिक्षण संस्थेतील गैरव्यवहारावर आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
खालापूर, ता. २४ (बातमीदार) ः खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. संस्थेच्या कारभाराची विशेष लेखापरीक्षणाद्वारे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात २०२६-२०३१ या कालावधीसाठी झालेली निवड प्रक्रिया वादात सापडली असून, मंडळाचे माजी सदस्य यशवंत साबळे यांनी याप्रकरणी कायदेशीर लढा सुरू केला आहे. आगामी पाच वर्षांसाठी झालेली निवड प्रक्रिया पारदर्शक नसून ती स्थगित करावी आणि संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी साबळे यांनी केली आहे. संस्थेची निवड प्रक्रिया स्थगित करून नव्याने पारदर्शकपणे राबविण्यात यावी. संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण प्रशासक नियुक्त करून करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मोर्चा काढणार होते परंतु दहावीची परीक्षा सुरू असल्याने खोपोली पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. अशातच आता प्रशांत ठाकूर यांनीही या प्रकरणाची दखल घेत अधिवेशनात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ घोटाळ्याला वाचा फोडणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, तालुक्यातील ही महत्त्वाची शिक्षण संस्था असून, हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असल्याने या विषयाचे राजकारण होऊ नये, असे पालकांना वाटते. पदासाठी वाद असतील तर विद्यार्थी आणि तालुक्याचे शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने या प्रकरणाचा योग्य तो तपास करीत आहे. तपासाअंती खरे काय आहे ते बाहेर येईलच. ही बाब न्यायसंस्थेशी निगडीत असल्याने त्याबाबतीत अधिक भाष्य करणे उचित होणार नाही. आमचा पोलिस यंत्रणेवर आणि न्याय संस्थेवर संपूर्ण विश्वास आहे.
- संतोष जंगम, अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.