मुंबई

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार

CD

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार
प्रांगण फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवली, ता. २४ : शहापूर तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी प्रांगण फाउंडेशन आणि हायजिनिक रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा लाभ इयत्ता ८ वी ते १० वीच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना झाला आहे.

विद्यार्थ्यांना शालेय बॅग, एक्झाम पॅड, ज्योमेट्री बॉक्स, पेन, पेन्सिल आणि फुटपट्टी यांसारख्या मूलभूत साहित्याचे वाटप करण्यात आले. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विनोद अय्यर यांनी गणित विषयाचे विशेष मार्गदर्शन करून परीक्षेसाठी उपयुक्त टिप्स दिल्या. ''एचआरआय च्या सविता छाबरा यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

दुर्गम भागात आजही अनेक विद्यार्थ्यांना साध्या शैक्षणिक साहित्याअभावी अडचणी येतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो. हीच अडचण ओळखून विद्यार्थ्यांची परीक्षा तयारी सुलभ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना साहित्यासाठी करावी लागणारी वणवण थांबवून, त्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी आमचे कार्य अविरत सुरू राहील. असे आयोजक परिन कामदार व किरण भंडारी यांनी म्हटले.

सहभाग आणि नियोजन
उपक्रमाचे नेतृत्व परिन कामदार आणि किरण भंडारी यांनी केले. त्यांना वैभव पाटील व नितिका सिंह यांची मोलाची साथ लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रांगण फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि HRI च्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाच्या यशाची पावती ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT