मुंबई

करवाढीविरोधात शिवसेना आक्रमक

CD

करवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
पालिका मुख्यालयात ‘भीक मांगो’आंदोलन
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : नव्या घरांच्या मालमत्ता करात सत्ताधारी भाजपने एप्रिलपासून कर आकारणीत वाढ केली आहे. याविरोधात शिवसेनेने महापालिका मुख्यालयात मंगळवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.
मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याने उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर महासभेत भाजपने शहरात एप्रिलपासून नव्या घरांना आकारण्यात येणाऱ्या कराच्या दरात वाढ केली आहे. त्यानुसार नव्या घरांना २.४० पैसे ऐवजी चार रुपये प्रती चौरस फूट व व्यावसायिक मालमत्तांना चार रुपयांऐवजी सहा प्रती चौरस फूट दराने कर आकारणी केली जाणार आहे. या करवाढीला काँग्रेसने विरोध केला आहे. आता शिवसेनेनेदेखील दंड थोपटले आहेत. मंगळवारी (ता. २४) महापालिका मुख्यालयात शिवसेनेकडून ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. या वेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांवर करवाढीचा बोजा लादल्यास त्यांचे कंबरडे मोडणार आहे. तसेच सुविधांचा दर्जा वाढवण्याऐवजी केवळ करवाढ करणे अन्यायकारक असल्याचा आरोप करताना करवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी मुख्यालयाच्या इमारतीत शिरले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप झाला.
----------------------------
करवाढीसंदर्भात शिवसेनेकडून लोकांची दिशाभूल सुरू आहे. सध्या कराची देयके येत असलेल्या नागरिकांच्या करात कोणतीही वाढ केलेली नाही. एप्रिलपासून नव्याने कर आकारणी होणाऱ्या नव्या मालमत्तांच्या करात वाढ करण्यात आली आहे.
- ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT