मुंबई

परिवहन समितीवरून नवी मुंबई महापालिकेत गदारोळ

CD

परिवहन समितीवरून नवी मुंबई महापालिकेत गदारोळ
बहुमताच्या जोरावर भाजपचे १२ सदस्य; विरोधकांचा निषेध, सभात्याग
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत परिवहन समितीच्या १२ जागांच्या निवडीवरून सत्ताधारी भाजप व शिंदे गटातील शिवसेना आमनेसामने आल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. समितीसाठी भाजपने १२ नावे तर शिवसेनेने ८ नावे सुचवली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्रमाणात्मक प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा शिवसेनेची होती; मात्र सचिवांनी कलम २५ (२) व (३) नुसार मतदान प्रक्रियेची घोषणा केली.
बहुमताच्या आधारे हात वर करून मतदान घेण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिल्याने शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. महापौर सुजाता पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करीत महिला नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर घेराव घातला. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन सभा १५ मिनिटे तहकूब करण्यात आली. त्यानंतरही महापौरांनी मतदान प्रक्रिया कायम ठेवत १२ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. निषेध म्हणून शिवसेनेने सभात्याग केला.
सभागृह नेते सागर नाईक यांनी सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत झाल्याचा दावा केला, तर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या निर्णयाविरोधात नगरविकास खात्याकडे अपील करणार असल्याचे स्पष्ट केले.
चौकट
नवनिर्वाचित परिवहन समिती सदस्य
१) विकास झंजाड
२) ॲड. यशपाल ओव्हाळ
३) अभिजित पेडणेकर
४) विनोद तुळशीराम म्हात्रे
५) राहुल शिंदे
६) राजेश्री कातकरी
७) रोशन पाटील
८) हनुमंत कोंडिबा रोडे
९) कुणाल महाडिक
१०) तीर्था मारुती सकपाळ
११) राजेश हौसला राय
१२) शीतल भोईर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT