मुंबई

कुंभारखाणपाडा स्मशानभूमीची समस्या सोडवा

CD

कुंभारखाणपाडा स्मशानभूमीत सुविधांचा अभाव
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबांना मनस्ताप; भाजपकडून आंदोलनाचा इशारा

डोंबिवली, ता. २४ : डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी पश्चिम भागातील कुंभारखाणपाडा स्मशानभूमीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे; मात्र या ठिकाणी किमान मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे.

माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी या ठिकाणच्या दुर्दैवी अनुभवाबद्दल संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, नुकतेच दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी येथे आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते. यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत धाव घ्यावी लागली. अंतिम समयी अशा प्रकारे नातेवाइकांची वणवण होणे ही प्रशासनाची मोठी चूक आहे. मंगळवारी प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. "जर २४ तासांत कर्मचारी नियुक्त केले नाहीत आणि सुविधा पुरवल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा या वेळी देण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा अभाव
स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. तसेच येथे पाण्याची तीव्र टंचाई असून, स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांची नियमित साफसफाई केली जात नाही. पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते, तसेच पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT