मुंबई

बदलापुरात शिवकाळ अवतरला

CD

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळेजवळील मैदानात ‘शिवशंभु शौर्यगाथा’ या नाट्यमय ऐतिहासिक कार्यक्रम दिमाखात पार पडला. या भव्य नाट्यप्रयोगात घोडे, उंट, बैलगाड्यांचा प्रत्यक्ष वापर करून युद्धप्रसंग साकारण्यात आले. जवळपास ३०० कलाकारांच्या सहभागातून शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानापर्यंतचा इतिहास रंगमंचावर जिवंत करण्यात आला.
शिवकालीन किल्ल्याची उभारलेली भव्य प्रतिकृती आणि नेत्रदीपक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण वातावरण ऐतिहासिक काळात नेऊन ठेवणारे ठरले. नाट्यप्रयोगात माता जिजाऊ, शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी प्रभावी अभिनय सादर केला. स्वराज्याची शपथ, किल्ले जिंकण्याच्या मोहिमा, अफजलखान वध, शाहिस्तेखान प्रसंग, आग्य्राहून सुटका, शिवराज्याभिषेक तसेच संभाजी महाराजांची पराक्रमी लढाई आणि औरंगजेबाच्या कैदेत झालेले अमानुष बलिदान-हे सर्व प्रसंग प्रेक्षकांना भारावून टाकणारे ठरले.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला मालोजीराजे भोसले, आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, सहाय्यक आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व व पश्चिमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

अन् अश्रू तरळले
संभाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगाने मैदानात क्षणभर स्तब्ध शांतता पसरली; हजारो शिवप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हजारो शिवप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांच्या कलेला दाद दिली. बदलापुरात इतक्या भव्य आणि दर्जेदार स्वरूपात साकारलेल्या या ऐतिहासिक नाट्यप्रयोगामुळे नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत, असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT