मुंबई

राज्य सरकारने पालिकेचे थकविले १५ हजार कोटी

CD

राज्याने थकविले १५ हजार कोटी
महापालिकेला विकास निधीचा तुटवडा भासल्याने ठेवींवर मदार

विष्णू सोनवणे, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः राज्य सरकारची अनुदाने, मालमत्ता कर, पाणीपट्टी, शिक्षण अनुदान यापोटी सुमारे १५ हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकबाकी आहे. त्यात दरवर्षी वाढ होत आहे. पालिकेने वारंवार मागणी करूनही राज्य सरकारचे विविध विभाग त्या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत. पालिकेला प्रकल्पांसाठी निधीची कमतरता असल्याने पालिका प्रशासनाची ठेवींवर मदार आहे. थकबाकीची रक्कम मिळाल्यास विविध प्रकल्पांसाठी आणि पायाभूत सुविधा निधी उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांकडून थकबाकी नऊ हजार कोटींच्या घरात आहे. यात मालमत्ता कर आणि इतर विविध देयकांचा समावेश आहे. फक्त मालमत्ता कराची रक्कम ३,३६८ कोटी रुपये असल्याचे समजते. राज्य सरकाराचे विभाग, पोलिस विभाग, एमएमआरडीए, शिक्षणासाठी अनुदान अशा विविध विभागांचा थकबाकीत समावेश आहे. दरवर्षी थकबाकीत वाढ होत असल्याची माहिती पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने दिली.

सरकारच्या विविध अनुदानापोटी सहाय्य अनुदान, मालमत्ता कर आदीपोटी ८,९३६ कोटी, तसेच शिक्षण अनुदानापोटी सहा हजार कोटी इतकी थकबाकी पालिकेला येणे आहे. त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या आर्थिक स्रोतांवर पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाच्या नवीन स्रोतावर या अर्थसंकल्पात भर देण्यात येण्याची शक्यता आहे. पालिकेची मालमत्ता करावर मदार आहे. मालमत्ता कर वाढविण्याठी पालिका प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याकडून फक्त २४३ कोटी रुपये वसूल केल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सागितले.

सरकारकडे पाठपुरावा
उपमुख्य लेखापाल वित्त तसेच विविध विभागामार्फत सातत्याने पाठपुरावा केल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. थकबाकी वसुलीसंदर्भात नियमित बैठकांमध्ये पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
-----------
थकविलेला मालमत्ता कर
एमएमआरडीए ९२९ कोटी
म्हाडा ३६८ कोटी
मुंबई पोलिस ७१ कोटी
राज्य सरकारची कार्यालये २२१ कोटी
---------
शैक्षणिक अनुदान - ६ हजार कोटी
-------------
मुंबई महापालिकेची राज्य सरकारकडे कोट्यवधी थकबाकी आहे. जेव्हा नगरविकास विभागासंदर्भात विधिमंडळात चर्चा होईल, तेव्हा आम्ही थकबाकीचा विषय उचलू, पण सरकार या विषयाची दखल घेत नाही. तीन वर्षे सरकारने पालिकेला मंडलिक बसविले आहे. मुंबईच्या विकासासाठी ही थकबाकी त्वरित द्यायला हवी.
- सुनील प्रभू, प्रतोद, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT