अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : पायी चाललेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवत, तिचा हात पकडून विनयभंग करणाऱ्या अजीज अनीस सय्यद (वय २६) याला श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ सोमवारी (ता. २३) रात्री अटक केली. अटकेतील सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याने तक्रारदार तथा पीडित मुलीच्या भावाला मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगी ही पाचवीत शिकणारी असून ती पायी जात असताना, आरोपीने तिला रस्त्यात अडवून थांबवले. तिचा हात पकडून तिला मिठी मारली. त्याला मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला हाताने मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (ता. १८) घडला. त्या घटनेनंतर त्याचा जाब विचारण्यासाठी रविवारी (ता. २३) सायंकाळी पीडित मुलीचा भाऊ गेला असताना आरोपीने त्यालाही मारहाण केली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात मारहाण आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.