मुंबई

प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे चिंचघरमध्ये धडे

CD

प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे चिंचघरमध्ये धडे
वाडा (बातमीदार)ः पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत गावागावातील कचरा, प्लॅस्टिकचे निर्मूलन करून गावे स्वच्छ, सुंदर, दुर्गंधीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच अनुषंगाने उपक्रमांतर्गत चिंचघर ग्रामपंचायतने संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून गावात प्लॅस्टिक व्यवस्थापन जनजागृती करण्यात आली. यानिमित्ताने गावातून स्वच्छता संदेश रॅली काढण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीने बांधलेल्या कचरा विलगीकरण शेडचे उद्घघाटन करण्यात आले. या वेळी चिंचघर ग्रामपंचायतच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शनाला उपस्थितांनी भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रेमा नांगरे, उपसरपंच कैलास ठाकरे, माजी उपसरपंच मनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी पंढरीनाथ सासे, सएसीआर संस्थेच्या समन्वयक मंजूषा सोनुने, प्राची पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT