मुंबई

वाढवणमधील सुशिक्षितांना नोकरीची संधी

CD

वाढवणमधील सुशिक्षितांना नोकरीची संधी
वाणगावच्या सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीकडून करार
तारापूर, ता. २५ (बातमीदार)ः वाढवण बंदर प्रकल्प अंतर्गत समुद्रात माती भरावाचे काम करणाऱ्या वाणगाव येथील सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र यांच्यात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र शासनाच्या पीएम सेतू योजनेअंतर्गत स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत समुद्रात माती भरावाचे कंत्राट मिळालेल्या सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून डहाणूतील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेषतः किनारपट्टीवरील बाधित गावांमधील सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाणगाव येथील कार्यालयीन तसेच इतर विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वाढवण बंदराचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, सेमिंडिया तसेच इतर संबंधित कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, बंदराशी निगडित विविध रोजगारांमध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
----------------------------------
मूलभूत सुविधांवर भर
- आगामी काळात गावांमध्ये रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, अंगणवाडी, समाजमंदिर, धूपप्रतिबंधक बंधारे, व्यायामशाळा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- सध्या कंपनीमध्ये विविध पदांवर स्थानिक ६० कामगार कार्यरत असून, २४ ठेकेदारांमार्फत दगड टाकण्याचे काम सुरू आहे. स्थानिक युवकांच्या रोजगाराबाबत सकारात्मक चित्र स्पष्ट होत असून, गावपातळीवरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
------------------------------
आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो. सध्या वाढवण बंदराच्या माती-मुरूम भरणीचा ठेका सेमिंडिया कंपनीला मिळाला आहे. या कंपनीत फर्म स्थापन करून काम करत आहोत. त्यामुळे आमची आर्थिक प्रगती चांगली झाली आहे.
- अभिनय राऊत, वरोर
--------------------------------
वाणगाव येथे सेमिंडिया कंपनीमार्फत वाढवण बंदराचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व स्थानिक बेरोजगार युवकांना विविध प्रकारची कामे देण्यात आली आहेत. यापुढेही आमची कंपनी प्राधान्याने स्थानिक युवकांनाच संधी देणार आहे.
- विलास पानसे, प्रकल्प मॅनेजर, सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT