मुंबई

रेशनवाटपात डहाणू आघाडीवर

CD

रेशनवाटपात डहाणू आघाडीवर
डिजिटल प्रणालीमुळे हजारो कुटुंबांना दिलासा
कासा, ता.२५ (बातमीदार)ः डहाणू तालुक्याने शिधापत्रिका सक्षमीकरण, आधार सीडिंग, ऑनलाइन नोंदणी, डिजिटल (बायोमेट्रिक) धान्यवाटप, नियमित पुरवठामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. त्यामुळे दुर्गम व आदिवासीबहुल पालघर जिल्हामध्ये आदर्श कामगिरी ठरली आहे.
तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमितपणे धान्यवाटप होत आहे. सर्व रास्त भाव दुकाने आधुनिक डिजिटल मशीन प्रणालीने सुसज्ज आहेत. रेशन वितरणात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक युनिट मानून धान्याचे प्रमाण ठरवले जाते. अंत्योदय योजनेअंतर्गत प्रति कुटुंब दरमहा सुमारे ३५ किलो धान्य दिले जाते, तर प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो धान्य (साधारण तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू) वितरित केले जाते. तसेच पूर्वी हाताने नोंदी करून धान्यवाटप होत होते. मात्र, बहुतांश ठिकाणी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
-----------------------------------------
रेशन दुकाने - २०७
ऑफलाइन - ५
पिवळे कार्ड - १९,७२८
केशरी कार्ड - ४५,७३२
नॉन-प्रायोरिटी - ९,६६९
शिधापत्रिकाधारक - ७५,१२९
-----------------------------------------
तालुक्यातील बहुतांश शिधापत्रिकेसंबंधित सर्व कामे ऑनलाइन पूर्ण झाली आहेत. पालघर जिल्ह्यात याबाबतीत डहाणू तालुका प्रथम क्रमांकावर आहे. सर्व रेशनधारकांना नियमितपणे बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप केले जाते.
- रवींद्र गायकवाड, तालुका अन्नपुरवठा अधिकारी, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT