मुंबई

चोरीतील नऊ तोळे दागिने हस्तगत

CD

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : मुरबाड बस स्थानकावर एसटी बसमध्ये चढताना वाहतूक पोलिसाच्या पत्नीचे चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी नऊ तोळे वजनाचे दागिने परत मिळवण्यात ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी मुंबईतील भांडुप येथील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याकडून नऊ तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित सुमारे आठ तोळे दागिने अद्यापही हाती लागलेले नाहीत.
वाहतूक पोलिस संजय घुडे यांच्या पत्नी सारिका घुडे या सरळगाव येथे जाण्यासाठी २१ डिसेंबर २०२४ मध्ये मुरबाड स्थानकावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याची गंठण, बोरमाळ, हार व बांगड्या असे एकूण १७.७५ तोळे वजनाचे, सुमारे आठ लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान ठाणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंबईतील भांडुप परिसरातील लक्ष्मी जाधव या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून नऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईस डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप गीते यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, भाऊ गायकवाड, हवालदार सतीश कोळी, हेमंत विभुते, गोविंद कोळी, रवींद्र मोरे आदींच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत ही कारवाई केली.
दरम्यान, चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी उर्वरित सुमारे आठ तोळे वजनाचे दागिने शोधण्याचे काम मुरबाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदिपान सोनवणे करीत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT