मुंबई

“आदेश कागदावरच;

CD

अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रहिवाशांचा एल्गार
कारवाईच्या विलंबामुळे संताप; महापालिका मुख्यालयावर आंदोलन
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : श्री विनायक आशीष अपार्टमेंटमधील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्नाने आता उग्र रूप धारण केले आहे. पालिका प्रशासनाने हे बांधकाम अवैध ठरवूनही वर्षभर यावर कोणतीही कारवाई न केल्याने, रहिवाशांनी आता थेट संघर्षाची भूमिका घेतली आहे. गुरुवारी (ता. २६) कल्याण महापालिका मुख्यालयाबाहेर रहिवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
श्री विनायक आशीष अपार्टमेंटच्या आवारातील सार्वजनिक पार्किंगच्या जागेवर पाच अनधिकृत गाळे आणि दोन बेकायदेशीर सदनिका उभारण्यात आल्या आहेत. याविरोधात रहिवाशांनी कायदेशीर लढा दिल्यानंतर, महापालिकेने २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत हे बांधकाम अनधिकृत ठरवत १५ दिवसांत हटवण्याचे लेखी आदेशही देण्यात आले होते, परंतु १२ महिने उलटूनही अद्याप कारवाई झालेली नाही. याविरोधात रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत गुरुवारी आंदोलन करणार आहेत. दरम्यान, माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनीही याप्रकरणी आयुक्तांना पत्र पाठवून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
बेकायदेशीर बांधकामावर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सोसायटीने व्यक्त केला आहे. प्रशासनाने न्याय दिला नाही, तर रहिवासी अर्धनग्न आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा सोसायटीचे अध्यक्ष राहुल केळूसकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Holi Thandai Recipe: होळीला पाहुण्यांची मनं जिंकायची आहेत? मिनिटांत तयार करा 'थंडाई' पिताच सगळे म्हणतील ‘अरे वा!’, जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला PM किसान, नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा

Igatpuri News : बेरोजगारीवर मात! इगतपुरीतील तरुण पिढीचा दुग्धव्यवसायाकडे वाढता कल; रोज १ लाख लिटर संकलन

SCROLL FOR NEXT