कल्याण पश्चिमेत पाणीप्रश्न गंभीर
काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ ः कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. आठमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
प्रभाग क्र. आठ या प्रभागात बहुसंख्य मुस्लिम बांधव वास्तव्यास असून, सध्या रमजानचा महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत पाणी नसल्याने नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीच्या काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जात होते. मात्र, निवडणुकी होताच अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पुढील आठ दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त, महापौर आणि संबंधित अधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.