मुंबई

रिंगरूट अर्धवट, रस्ता व्यापाऱ्यांच्या ताब्यात;

CD

रिंगरोड व्यापाऱ्यांच्या ताब्यात
वासुंद्री रोडवरील अनधिकृत आठवडा बाजारावर अखेर महापालिकेची कारवाई
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : रखडलेल्या रिंगरोडच्या मोकळ्या जागेवर मंगळवारी अनधिकृत आठवडा बाजार भरवला जात होता. या बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेच्या त्रासाला नागरिकांना सामोर जावे लागत होते. अखेर महापालिकेने अनधिकृत आठवडा बाजारावर धडक कारवाई केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील गणेश प्रतिमा चौक हा वासुंद्री आणि रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षा आणि शालेय बसेससाठी महत्त्वाचा वळण मार्ग आहे. मात्र, या ठिकाणी दर मंगळवारी अनधिकृतपणे आठवडा बाजार भरवला जात होता. मुख्य रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या आणि शेड उभारल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. अनेकदा रुग्णवाहिकाही या गर्दीत अडकून पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल आणि रोख रक्कम चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तसेच, बाजारातील अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका व्यक्त केला जात होता. या फेरीवाल्यांमुळे अधिकृत दुकानदारांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत होता. यामुळे हा आठवडा बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरत होता. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण व फेरीवाला पथकाने धडक मोहीम राबवत अनधिकृत फेरीवाले हटवले असून, रस्ता मोकळा केला आहे. या कारवाईनंतर परिसरात वाहतुकीची स्थिती सुरळीत होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
दरम्यान, रखडलेल्या रिंगरोडच्या प्रश्नावर प्रशासनाने आता ठोस निर्णय घेतला नाही, तर पुन्हा अतिक्रमणाचे सावट वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी प्रस्थापित करणारी ठरते का, याकडे टिटवाळेकरांचे लक्ष लागून आहे.

कठोर कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण आणि फेरीवाला पथकाने धडक मोहीम राबवून सर्व अनधिकृत स्टॉल्स हटवले असून, रस्ता मोकळा केला आहे. या कारवाईमुळे बनेली मार्केट आणि माता मंदिर रोड परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी सार्वजनिक रस्ता बळकावून व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात ‘नरेंद्र सरेंडर’ आंदोलन

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT