मुंबई

इयत्ता तिसरीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील मजकुरावरून महापौरांकडे तक्रार

CD

तिसरीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील मजकुरावरून महापौरांकडे तक्रार

घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : इयत्ता तिसरीच्या आयसीएसई हिंदी पुस्तकातील ‘जल्दबाज़ी ठीक नहीं’ या धड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिशाभूल करणारा उल्लेख आढळल्याचा आरोप करत राष्ट्रीय लोकदल पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. वेदप्रकाश तिवारी यांनी मंगळवारी (ता. २४) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. तिवारी यांनी संबंधित धड्यातील मजकूर ऐतिहासिकदृष्ट्या अपूर्ण असून, विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा समज निर्माण करणारा असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.
प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर इतिहासाची अचूक, संतुलित माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सदर मजकुराची तत्काळ दुरुस्ती करावी अथवा तो धडा वगळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत ऐतिहासिक सत्यतेचे जतन केले जाईल आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT