मुंबई

खासगी बसमध्ये कोट्यवधीचे सोने लंपास

CD

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : खासगी बसमधून कराड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याची तब्बल एक कोटी १४ लाखांची ९५३ ग्रॅम सोन्याची लगड आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बस खारघरमध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील भायखळा येथे राहणारे महेंद्र मोहनलाल जैन (वय ६४) यांचा सोन्याचे दागिने बनवून विकण्याचा व्यवसाय आहे. यानिमित्त ते कराड येथे गेले होते. त्यानंतर २० फेब्रुवारीला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते श्री दुर्गाबा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने मुंबईत परत होते. त्यांनी बॅगेत ६०० ग्रॅम कच्चे सोने, १४.५ ग्रॅम सोन्याची लगड, ३३८.८२ ग्रॅम सोन्याची लगड, तसेच ६० हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण तब्बल एक कोटी १४ लाख ३० हजारांचा ऐवज ठेवला होता. प्रवासादरम्यान जैन झोपी गेले असताना, बसमध्ये असलेल्या चोरट्याने अंधाराचा फायदा उचलत जैन यांच्याजवळ असलेल्या बॅगेतील सोने आणि रोख रक्कम चोरली. ही बस सकाळी खारघर येथे आल्यानंतर सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे जैन यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, त्यांना चोर सापडला नाही. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (ता. २४) खारघर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT