मुंबई

कल्याणात बारावीच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन

CD

कल्याणात बारावीच्या
विद्यार्थिनीने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी एका नामांकित महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, आपण उत्तीर्ण होणार नाही, या प्रचंड मानसिक दडपणाखाली तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली. यामध्ये तिने आपल्या मनातील भीती आणि पालकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चिठ्ठीमुळे परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच कुत्रा चावल्यानंतर आपल्याला रेबीज होईल, या भीतीने एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचललेल्या पावलामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण पसरले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या केवळ परीक्षेच्या भीतीतून झाली आहे की यामागे काही वैयक्तिक किंवा अन्य कारण आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT