मुंबई

थोडक्यात

CD

सारसोळे गावात अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
नेरूळ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागाने सारसोळे गावातील सेक्टर ६, प्लॉट क्रमांक ०१५२ येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ अंतर्गत नोटीस देण्यात आली होती; मात्र मुदतीत बांधकाम न हटवल्याने कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी, सात मजूर, दोन जेसीबी, पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. अतिक्रमणाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
------------------------------------------------------
नेरूळमध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
नेरूळ (बातमीदार) : महावितरणने विक्रम बारलगतच्या डीपीपासून सिडकोच्या शिवम सोसायटीपर्यंत विद्युत केबल टाकण्यासाठी जेसीबीने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या कामासाठी नवी मुंबई महानगरपालिकाची परवानगी घेतली आहे का व आवश्यक शुल्क भरले आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. विनापरवानगी काम केल्यास गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आहे. खोदकामामुळे रस्ता कच्चा झाला असून वाहतूक व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
----------------------------------------------
सीवूडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत
नेरूळ (बातमीदार) : राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवमहाआरती, हळदी-कुंकू व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सलग ११व्या वर्षी झालेल्या या सोहळ्यात महिलांनी स्पर्धा व मनोरंजनाचा आनंद लुटला. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------------------------------------
ज्ञानदीप हायस्कूलमध्ये आगरी बोलीवर व्याख्यान
नेरूळ (वार्ताहर) : मराठी भाषा दिनानिमित्त कवी, लेखक व समीक्षक गजानन म्हात्रे यांचे आगरी बोलीवरील व्याख्यान २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता करावेगावे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. आगरी नाटके, काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी तसेच ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांवरील संशोधन प्रकाशित करणाऱ्या म्हात्रे यांच्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आगरी बोलीवरील त्यांचा ‘आंग्रु डुंग्रू’ हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला आहे.
----------------------------------------------------------------------
विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती उपक्रम
खारघर (बातमीदार) : रोटरी क्लब खारघरच्या वतीने सेक्टर १९ मधील न्यू इंग्लिश स्कूल, मुरबी गाव येथे सुमारे १५० विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. डॉ. क्रांती फडणीस यांनी मासिक पाळी, स्वच्छता व संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक व रोटरी सदस्य उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
शिवजयंतीनिमित्त दिव्यांगांना सायकल वाटप
खारघर (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री छत्रपती शाहू महाराज फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रम श्री देवाळेश्वर मैदान येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. लाभार्थी व ज्येष्ठ नागरिकांना अल्पोहारही देण्यात आला.
-------------------------------------------------------------
सशक्तिकरण संस्थेचा वार्षिकोत्सव उत्साहात
खारघर (बातमीदार) : राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थेचा ४२ वा वार्षिकोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुमन कुमार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य व वेशभूषा सादरीकरणातून कलागुण सादर केले. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रम डॉ. रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
---------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT