मुंबई

घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना मिळणार शिप्टींन चार्जेस

CD

घरे रिकामी करणाऱ्यांना स्थलांतर शुल्क
पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. येथील रहिवाशांनी आपली घरे लवकर रिकामी करावीत, म्हणून म्हाडाकडून रहिवाशांना स्थलांतर शुल्क (शिफ्टिंग चार्जेस) दिले जाणार आहेत. ही रक्कम सुमारे १० ते १५ हजार रुपये असणार आहे.
१९९०च्या दशकात पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत उभारण्यात आली. चार मजल्यांच्या १७ इमारतींत ९४२ निवासी व ४२ अनिवासी असे एकूण ९८४ गाळे आहेत. संरचनात्मक अहवालानुसार, या इमारती जीर्ण झाल्याने सरकारच्या मंजुरीने या वसाहतीचा म्हाडा पुनर्विकास करणार आहे. कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, येथील ९४२ निवासी सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यासाठी दोन लाखांचा कॉर्पस फंड देण्याची तयारी म्हाडाने दर्शवली आहे. भाडे तसेच स्थलांतर शुल्कही दिले जाणार आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या सदनिका लवकर रिकाम्या होतील, असा विश्वास म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविला. दरम्यान, शिफ्टिंगचे शुल्क मिळवण्यासाठी संबंधित रहिवाशाने घर रिकामे केल्याचे पुरावे देणे आवश्यक असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT