मुंबई

विशेष समित्यांसाठी इच्छुकांची लॉबिंग

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : महापालिकेच्या सोमवारी (ता. २३) पार पडलेल्या तहकूब सभेत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने शिवसेनेलाच घेरण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या गदारोळामुळे स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीचा विषय मागे घेण्यात आला. त्यातच आता, ठाणे पालिकेची सर्वसाधारण सभा ५ मार्चला आयोजित करण्यात येणार असून या सभेत स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. मात्र, स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय अधिकृत अजेंड्यावर नसतानाही तो शुद्धीपत्रकाद्वारे सभेपुढे आणण्याची हालचाल प्रशासन पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीनंतर सभागृहातील पक्षीय चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) ७५, भाजप २८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ९, एमआयएम ५, शिवसेना (ठाकरे गट) आणि अपक्ष प्रत्येकी एक असे एकूण १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यातच आता नगरसेवक संख्याबळानुसार, स्थायी समिती, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पहिल्या सभेच्या पटलावर होता, मात्र तो अचानकपणे मागे घेण्यात आला होता.

स्थायी समितीत १६ सदस्य
संख्याबळानुसार स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती अपेक्षित आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे गट १०, भाजप तीन, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य असे समीकरण असण्याची शक्यता आहे. पहिल्या सभेत हा विषय समाविष्ट होता; मात्र तो अचानक मागे घेण्यात आला होता. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

विशेष समित्या व परिवहन समितीसाठी हालचाली
शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, क्रीडा-सामाजिक व सांस्कृतिक आणि झोपडपट्टी पुनर्वसन या पाच विशेष समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसेच परिवहन समितीत एक पदसिद्ध सदस्य वगळता १२ सदस्यांची निवड होणार आहे. या सर्व समित्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांकडून पक्ष नेतृत्वाकडे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत पराभूत झालेले किंवा पक्ष आदेशानुसार माघार घेतलेले काही जणही स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. पक्षासाठी केलेल्या कामांची माहिती देत इच्छुक नेते लॉबिंग करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अर्ज वितरणाबाबत संभ्रम
स्वीकृत नगरसेवक व परिवहन समिती सदस्य पदांसाठी अर्ज वितरण बुधवार (ता. २५)पासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अर्ज देण्यात येणार होते, मात्र प्रत्यक्षात अर्ज उपलब्ध नसल्याने वितरण थांबविण्यात आल्याचे इच्छुकांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT