मुंबई

ठाणे थोडक्यात बातम्या

CD

वॉशिंग मशीनला आग
ठाणे : कळवा, पारसिक नगर येथील ओझोन व्हॅली या बिल्डिंग क्रमांक २ मधील इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रूम नंबर ७०१ मधील वॉशिंग मशीनला बुधवारी (ता. २५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेत त्या मशीनचे नुकसान झाले असून, ती आग किरण इरप यांच्या मालकीच्या घरात आग लागली. त्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
..................
तरुणीचा महागडा मोबाईल लंपास
ठाणे : दिवा येथील रहिवासी अर्चना मूर्गन मुपप्णार (वय २४) या तरुणीचा सुमारे ८९ हजार ९०० रुपयांचा मोबाईल फोन लोकल प्रवासादरम्यान चोरीस गेला आहे. ती तरुणी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी दिवा रेल्वे स्थानकावरून ठाणे धीम्या लोकलने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बॅगमधील मोबाईल लंपास केला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
............
मॉलमध्ये काजू, तुपाची चोरी
ठाणे : शिळफाटा परिसरातील एका मॉलमध्ये ऑडिटपूर्व तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात माल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखा परिधान केलेली महिला चोरी करताना कैद झाली आहे. याप्रकरणी मुद्दसर नईम शेख (वय ४२) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्या मॉलमधून चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ११५ किलो काजू व १३५ किलो तुपाचा (घी) समावेश असून, अंदाजे एक लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
........................
रिक्षाच्या धडकेत महिला जखमी
ठाणे : विटावा परिसरात भरधाव वेगाने आलेल्या अनोळखी रिक्षाने दिलेल्या धडकेत मुलीसह रस्ता ओलांडणाऱ्या दिवा-भिवंडी येथे राहणाऱ्या हिस्बाई जोशी या वयोवृद्ध महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. ही घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता विटावा ट्रॅफिक पोलिस चौकीजवळ घडली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............
कौसा मार्केटमध्ये मोबाईल चोरीला
ठाणे : मुंब्रा येथील कौसा मार्केट परिसरात खरेदीसाठी गेलेल्या रेहाना एकबाल शेख (वय ४५) या महिलेच्या पर्समधून मोबाईल चोरीला गेला आहे. रविवारी (ता.२२) दुपारी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला रमजान महिन्यानिमित्त इफ्तारसाठी खरेदी करण्यासाठी कौसा मार्केटमध्ये गेली होती. चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत २५ हजार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT