मुंबई

शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएम मशीनमधून मतदान

CD

शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएममधून मतदान
पोलादपूर तालुक्यातील सडवली शाळेचा अनोखा उपक्रम
पोलादपूर, ता. २६ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका उत्साहात पार पडल्या. अशातच, पोलादपूर तालुक्यातील सडवली जिल्हा परिषद शाळेत एका आगळ्यावेगळ्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरच्या साहाय्याने मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव घेतला.
पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा, डिजिटल शाळा अशी सडवली शाळेची ओळख आहे. शाळेचे मुख्याध्यापक आखाडे व शिक्षक सुनील पवार हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम शाळेत राबवत असतात. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी शाळेच्या मुख्यमंत्रीपदासाठी थेट मशीन व बॅलेट पेपर याद्वारे मतदान प्रक्रिया मंगळवारी (ता. २४) पार पडली. यापूर्वी शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी असलेले उमेदवार रुद्र नांदे व तनिष्का जगताप यांनी शाळेमध्ये प्रचार केला. पॅम्प्लेटद्वारे जाहीरनामा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांची सभा घेतली व भाषणे केली. शाळेतून प्रचार फेरी देखील काढली. मतदानाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या मतदार याद्या फलकावर प्रकाशित करण्यात आल्या. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया रुद्र नांदे या विद्यार्थ्याने बनविलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे व बॅलेट पेपर या दोघांच्या माध्यमातून पार पडली. दोन्ही उमेदवाराकडून उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रात बसवले. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आखाडे यांनी काम पाहिले. दुपारी साडेबारा वाजता ईव्हीएम मशीन व बॅलेट पेपर यांचा निकाल जाहीर करण्यात आला व या निकालात तनिष्का जगताप ही विद्यार्थिनी विजयी झाली. प्रत्यक्षात लोकशाहीचा उत्सव अनुभवता आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. सडवली प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यानेच साकारले मशीन
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, या निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशीन रुद्र नांदे या चौथीच्या विद्यार्थ्याने स्वतः तयार केले होते. या मशीनद्वारे विद्यार्थ्यांनी उत्साहाने मतदान केले. डिजिटल आणि आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सडवली शाळेने या उपक्रमातून पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT