मुंबई

"तानपुरा आणि त्याचे हिंदुस्थानी संगीतातील महत्व आणि त्याचे सप्रयोग व्याख्यान"

CD

कल्याण गायन समाजातर्फे विशेष व्याख्यान
प्रसिद्ध वाद्यतज्ज्ञ बाळासाहेब मिरजकर यांचे मार्गदर्शन
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : भारतीय शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या ‘तानपुरा’ या वाद्याचे महत्त्व विशद करण्यासाठी कल्याणमध्ये एका विशेष सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १ मार्च) सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत कल्याण पश्चिमेतील टिळक चौक येथील ऐतिहासिक कल्याण गायन समाज येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुरा सोयीचा असला, तरी तो मूळ अकोस्टिक (शास्त्रीय) तानपुऱ्याची जागा घेऊ शकत नाही. याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मिरज येथील नामवंत वाद्यनिर्माते आणि जाणकार बाळासाहेब मिरजकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तानपुऱ्याची निवड, त्याची निगा आणि संगीतातील त्याचे अनन्यसाधारण महत्त्व यावर ते सप्रयोग भाष्य करतील.

प्रवेश विनामूल्य
कल्याण गायन समाजाने आपल्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून हा अत्यंत उपयुक्त कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमामुळे नवोदित कलाकार आणि संगीत विद्यार्थ्यांना तानपुऱ्याच्या सुरांचे बारकावे समजून घेता येतील. कल्याण-डोंबिवली परिसरातील सर्व संगीत साधक आणि विद्यार्थ्यांनी या ज्ञानवर्धक व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजिका मनीषा घारपुरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT